Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

आदिवासी कलाकार सादर करणार रामायणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम

आदिवासी कलाकार सादर करणार रामायणावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम

‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २२ मार्च रोजी आयोजन

marathinews24.com

पुणे – एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल – भारताचे रंग, एकलच्या संगतीने” हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या एकल अभियान या देशव्यापी उपक्रमाच्या जनजागृती आणि संपर्क मोहिमेचा हा एक भाग आहे.

जगण्याला बळ देणारी मातृभाषा टिकवायला हवी – रामदास फुटाणे – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “एकल सुर-ताल” ही विशेष सांस्कृतिक प्रस्तुती होय. एकल अभियान अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी तरुण-तरुणींचा चमू संगीत, नृत्य आणि नाट्यमय कथनाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे. भारतीय परंपरा, संस्कार आणि रामायण या महाकाव्यावर आधारित कथानक सादर करत कलाकार भारतीय संस्कृतीचे वैभव प्रेक्षकांसमोर उभे करणार आहेत. पारंपरिक वेशभूषा, लयबद्ध नृत्य आणि प्रभावी संगीत यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असला तरी सभागृहातील जागा मर्यादित असल्याने उपस्थित राहू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ८८५६०५०२५८ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुण्यातील सांस्कृतिक रसिकांसाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×