Marathinew24.com Team : दरमहा खंडणी देण्यास नकार दिल्याने दुकानात शिरुन तोडफोड केली. दहशत माजवून दुकानदाराला मारहाण करुन जखमी केले. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून तिचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Chikhali Crime News)
याबाबत करमीराम मुपाराम देवासी (वय ३०, रा. टॉवरलाईन, श्रीराम कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कार्तिक ऊर्फ फुक्या जाधव, आर्यन ऊर्फ अशोक रयकाल, शुभम जाधव (सर्व रा. मोरे वस्ती, चिखली) व त्यांचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चिखलीतील मोरेवस्तीतील श्री शांतीनाथ टेलिकॉम या दुकानासमोर २७ मार्च रोजी रात्री ९ वाजता घडला.