Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

देशासह राज्यामध्ये ई – नोटरी करा

देशासह राज्यामध्ये ई - नोटरी करा

भाजपा व्यापारी आघाडीची मागणी

marathinews24.com

पुणे – देशासह राज्यामध्ये ई – नोटरी करा – देशात व राज्यामध्ये ई नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण व ई-नोटरी प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहरचे वरिष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील निवेदन पाठवण्यात आले आहे.या प्रसंगी विक्रम चव्हाण, अंकित तिवारी,अभिजित भोसले आणि इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लाच प्रकरणात मंडल अधिकाऱ्यासह दोघांना ‘एसीबी’ने पकडले – सविस्तर बातमी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या सक्षम नेतृत्वाखाली देशाने व महाराष्ट्र राज्याने अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः डिजिटलीकरण आणि पारदर्शक प्रशासन या बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे. ह्या सकारात्मक दिशेला पुढे नेत, निवेदन आहे की देशातील व राज्यातील चालू असलेली पारंपरिक नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण करण्यात यावे आणि ई-नोटरी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात यावी.सध्या राज्यात बहुतेक नोटरी प्रक्रिया पारंपरिक हस्तलिखित / मॅन्युअल पद्धतीने होत असल्यामुळे दस्तऐवजांमध्ये चुका होणे, गैरवापर किंवा छेडछाड होण्याचा धोका कायम असतो. जर नोटरी प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ई-नोटरी प्रणालीद्वारे लागू केली गेली, तर ती अधिक सुलभ, सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वसनीय बनेल.

ई-नोटरी प्रणालीचे काही संभाव्य फायदे

१) दस्तऐवजांचे डिजिटल स्वरूपात दीर्घकालीन व सुरक्षित संग्रह.
२) दस्तऐवजांमध्ये फसवणूक, छेडछाड किंवा दुरुपयोग टाळता येईल.
३) प्रत्येक नोटरीसाठी विशिष्ट क्रमांक असलेल्या केंद्रीकृत प्रणालीची अमलबजावणी. प्रणालीमुळे राज्यातील नागरिकांची वेळ व पैशांची बचत होईल, तसेच डिजिटल महाराष्ट्र व ई-गव्हर्नन्स च्या उद्दिष्टांना अधिक चालना मिळेल. मंत्री महोदयांनी प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने विचार करण्याचे आश्वासन दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×