Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

पिस्तूल बाळगणार्‍या सराईताला पकडले

पुण्यात मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी ५ जणांना बेड्या

स्वारगेट पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पिस्तूल बाळगून फिरणार्‍या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीनमधील दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. विनोद चंदर शिंदे (वय ३१ रा. बुरूडगाव, अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार व कलमासह महाराष्ट्र पोलीस कायदा व कलमानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना – सविस्तर बातमी 

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने स्वारगेट पोलीस १० एप्रिलला सकाळच्या सुमारास एसटी स्टॅडसह सारसबाग परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील अमलदार सागर केकाण आणि सुजय पवार यांना पिस्तूल बाळगणार्‍या सराईताची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आदमबाग परिसरात विनोद शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम, पोलीस निरीक्षक विकास भारमळ, एपीआय अभिजीत पाटील, सागर केकाण, शिंदे, मोराळे, टोणपे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×