माजी महापौरांच्या बंगल्यावर लिंबू-नारळ फिरवले, रहिवाशांमध्ये कुजबुज
पोलिसांकडून महिलेला अटक
marathinews24
मराठी न्यूज२४ पुणे– शहराचे माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय धनकवडे यांच्या धनकवडीतील बंगल्यासमोर महिलेने नारळ,लिंबू, काळा आभिर ठेवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विवेक नामदेव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी महापौर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू दत्तात्रय धनकवडे हे धनकवडीत राहायला आहेत. त्यांच्या बंगल्यासमोर महिलेने लिंबू नारळ फिरवून भानामती केल्याचे दिसून आले आहे.
नव्या यशस्वी वाटचालीसाठी पर्णकुटी व सह्याद्री हॉस्पिटल्सचा हातभार – सविस्तर बातमी
मागील चार महिन्यापासून धनकवडीत अनेक ठिकाणी अमावस्येच्या दिवशी एक महिला नारळ,दूध भात, उकडलेली अंडी,लिंबू,काळा आभिर ठेवून देत होती. असाच प्रकार तिने शनिवारी 29 तारखेला अमावस्येच्या दिवशी दत्तात्रय धनकवडे यांच्या घरासमोर केला. दरम्यान, याप्रकाराबाबत नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात जादूटोणा विरोधी प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल केला. महिलेकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.