Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर मालवाहू टेम्पोला आग

फर्निचर जळून भस्मसात

marathinews24.com

पुणे – मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागल्याची घटना मुंबई बंगळुरु बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात घडली. आगीत टेम्पोसह फर्निचर भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

राम नदीला पुनरुज्जीवीत करण्याचा निर्धार – सविस्तर बातमी

बाह्यवळण मार्गावरुन शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो निघाला होता. वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर अचानक टेम्पोने पेट घेतला. टेम्पोत फर्निचर होते. टेम्पो पेटल्यानंतर फर्निचरला झळ पोहोचली. टेम्पोतील चालकाने प्रसंगावधान राखून बाजूला नेला. टेम्पो चालक बाहेर पडल्याने बचावला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, नीलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतीक पांगसे, दत्ताराय शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पो चालकाची चौकशी केली. तेव्हा मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात आला होता, अशी माहिती चालकाने दिली. आगीत महागडे फर्निचर भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×