Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

रस्ता ओलांडणार्‍या तरूणाला हायवाने चिरडले

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

कदमवाक वस्तीनजीक अपघात

marathinews24.com

पुणे – रस्ता ओलांडणार्‍या तरूणाला हायवा ट्रकने चिरडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीनजीक घडला आहे. याप्रकरणी हायवा ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसाराम जोराराम चौधरी (वय २३ रा. बारणेर, राजस्थान) असे अपघातात ठार झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे.

वादातून तरूणावर हल्ला, टोळक्याविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसाराम चौधरी हा मूळचा राजस्थानचा होता. तो कामानिमित्त कदमवाक वस्तीजवळ राहायला होता. ७ ऑक्टोबरला सकाळी साडेआठच्या सुमारास तो कामावर जाण्यासाठी जात होता. पेट्रोल साठा कंपनीच्या गेटक्रमांक दोनसमोर जसाराम रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव हायवा ट्रक चालकाने त्याला धडक दिली. त्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाल्यामुळे जसारामला रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×