भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर काचेची बाटली फेकून मारून जखमी केले. त्यावेळेस मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षकावर वार करून गंंभीररित्या जखमी केले. ही घटना ७ ऑक्टोबरला रात्री अकराच्या सुमारास कात्रजमधील तनिष्क रेस्टो बारसमोर घडली आहे.
पोलिस विभागाच्या अहवालानुसारच शस्त्र परवाना – सविस्तर बातमी
यश उर्फ धोंडिबा ढेबे, सोन्या ढेबे, दादया ढेबे याच्यासह अन्य साथीदारांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विठ्ठल जानकर (वय २३ रा. आंबेगाव पठार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सागर जानकर आणि आरोपी यांच्यात वादविवाद झाले होते. त्याच रागातून ७ ऑक्टोरबरला रात्री अकराच्या सुमारास चौघाजणांनी सागरला रेस्टो बारजवळ गाठले. तुला बघून घेतो आज, नेमका सापडलास असे म्हणून सागरच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्याचवेळी सुरक्षारक्षकाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करीत आहेत.



















