विमानाच्या बाथरूममधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी

विमानाच्या बाथरूममधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी

७५ लाखांचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर डाव उधळला

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीचा धक्कादायक प्रकार पुणे विमानतळावर उघडकीस आला आहे. बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेला सुमारे ७४ लाख ५० हजार रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा कस्टम विभागाने जप्त केला. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या तपासणीदरम्यान ही कारवाई केली.

डॉ. अजय तावरेला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे (आयएक्स २४१) विमान पुढे देशांतर्गत सेवेसाठी वापरण्यात येणार होते. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत तस्करांनी अमली पदार्थ लपवून ठेवण्याचा डाव आखला होता. विमानातील बाथरूममधील टिश्यू कॅबिनेटच्या फायबर भागाचे स्क्रू काढून त्यामागील पोकळीत दोन पिवळ्या रंगाची पाकिटे लपवण्यात आली होती. पुणे विमानतळावर उतरल्यावर कस्टम अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे सखोल तपासणी केली. त्यावेळी बाथरूममधील लपवलेल्या जागेतून दोन पाकिटे आढळून आली.

पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद केलेली आठ लहान पाकिटे होती. त्यामध्ये उच्च प्रतीचा ७४५ ग्रॅम वजनाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ सापडला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३) पुणे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे ७४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस ऍक्ट १९८५) अंतर्गत हा माल जप्त केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विमानाच्या पुढील देशांतर्गत प्रवासाचा फायदा घेऊन हा माल बाहेर काढण्याचा तस्करांचा डाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘तस्करी’ या वेबसिरीजमध्ये तस्करीसाठी कोणकोणत्या मार्गांचा अवलंब करतात हे दाखवले आहे. त्याच पद्धतीने बँकॉक-पुणे विमानात ड्रग तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने, तस्करांचा डाव फसला. या साखळीतील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×