शाळेमधील वर्गात थांबलेल्या शिक्षिकेला बाहेर चला, बाहेर भेटून बोलूयात असे म्हटल्यावर इथेच बोला, असे या शिक्षिकेने सांगितल्यावर त्यांचा हात ओढून आगळीक करण्याचा प्रयत्न केला. अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग करणार्या पालकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. (Molestation Case)
गणेश सुरेश अंबिके Ganesh Suresh Ambike (वय ४५, रा. लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी २४ तासात तपास पूर्ण करुन दोषारोपपत्रासह त्याला न्यायालयात हजर केले होते. ही घटना एका शाळेमध्ये २८ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिक्षिका या वर्गामध्ये मैत्रिणीसह बसल्या होत्या. त्यावेळी गणेश अंबिके तेथे आला. फिर्यादी यांना तुम्ही वर्गाच्या बाहेर चला. आपण बाहेर भेटून बोलुयात, असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी जे काही बोलायचे आहे, ते इथेच बोला असे सांगितले. त्याने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला धरुन त्यांच्याकडे ओढून आगळीक करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न केला असता त्याने अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला. तुला काय करायचे असेल ते कर, मी कोणालाही घाबरत नाही, असे म्हणून धमकी देऊन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारहाण केली. त्यांची मैत्रिण त्यांना सोडविण्याकरीता मध्ये आल्या असता, त्यांना याने हाताने ढकलून देऊन अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक दिंगबर सोनटक्के यांनी आरोपीला अटक करुन २४ तासात दोषारोपपत्र न्यायालयात हजर केले.