Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

वारजेत अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू, एकजण जखमी

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

बाह्यवळण मार्गावरील साई-सयाजीनगर परिसरातील कमानीजवळ अपघात 

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना वारजे भागात घडली. मुकेश छितरलाल दाबोडिया (रा. म्हाडा वसाहत, वारजे माळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात लाडले मेहबूब पटेल (वय ५०, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) हे जखमी झाले आहेत. याबाबत पटेल यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उधारीवर दारू न दिल्याने कामगाराला बदडले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल हे त्यांच्या मुलाच्या दुचाकीवरुन कोंढव्याकडे २९ मे रोजी निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील साई-सयाजीनगर परिसरातील कमानीजवळ पटेल यांच्या मुलाची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी लावली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वार दाबोडियाने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पटेल यांच्या मुलाच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दाबोडिया गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीजवळ थांबलेले पटेल हे जखमी झाले. उपचारानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार गांगुर्डे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×