Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडली

पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणीझाडे पडली

marathinews24.com

पुणे – शहरात झालेल्या पावसामुळे १३ ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले.

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश – सविस्तर बातमी

मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मध्यरात्रीनंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे, तसेच फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. सोमवारी सायंकाळपर्यंत १३ ठिकामी झाडे पडल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.

मध्यवर्ती प्रभात रस्ता गल्ली क्रमांक १४, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी, पाषाण परिसरातील सोमेश्वरवा़डी, बालेवाडीतील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, कोथरूडमधील महात्मा सोसायटी, सिंहगड रस्त्यावरील नित्यानंद हाॅल, सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक, महापालिका भवन, घोरपडीतील सोपानबाग, बिबवेवाडीतील हाॅटेल रुपाली, खराडीतील ठुबेनगर, कोथरूडमधील रामबाग काॅलनी परिसरात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

फडके हौद चौक परिसरात जुन्या वाड्याची भिंत कोसळली

मध्यभागातील फडके हौद चौक परिसरातील जुन्या वाड्याची भिंत कोसळण्याची घटना घडली, तसेच सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एक जाहिरात फलक कोसळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×