तरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणी

अपहरण करीत डांबून ठेवले, चौघांना अटक

marathinews24.com

पुणे – तरूणाला त्याच्यात घरात डांबून ठेउन बेदम मारहाण करीत १५ लाखांची खंडणी मागिल्याचा धक्कादायक प्रकार वाघोलीत घडला आहे. टोळक्याने तरूणाच्या चुलतभावाकडून १० लाख रूपयांची खंडणी स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना १४ ते १६ जून उबाळेनगर, वाघोली, पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी टोळक्याविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी

गौरव कांबळे (वय २९, रा. चिचंवड रेल्वे स्टेशनजवळ) ऋषिकेश किशोर शिंदे (वय २४, रा. निगडी) मोहम्मद इरफान खान (वय ३३ रा. नवी मुंबई) मोहम्मद अतहर सोहेल मोहम्मद अनवर (वय २८ रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे दोन साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. जवनताराम तीलोकरामजी चौधरी (सारंग) (वय ३७, रा. उबाळेनगर, वाघोली )यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चौधरी (सारंग) हे कुटूंबियासह वाघोलीतील उबाळेनगरात राहायला आहेत. १४ जूनला आरोपी गौरव कांबळे याने साथीदारांना बोलावून तक्रारदाराला त्यांच्या घरी गाठले. तु अक्षय आणि आर्यनला सोडून का दिले आहे, अशी विचारणा केली. अक्षयने घेतलेल्या २५ लाखापैकी १५ लाख रूपये मला दे अशी मागणी करीत आरोपी कांबळे साथीदारांच्या मदतीने चौधरी यांना जबरदस्तीने गाडीत बसविले.

त्यांना पिंपरी-चिंचवडमध्ये नेउन एका खोलीत डांबून ठेवत मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देउन १५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. चौधरी यांचा चुलतभाउ जेठाराम सारंग यांच्याकडून १० लाख रूपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अहिरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top