Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय

वडगाव शेरीतील सराफी पेढीत चोरी

marathinews24.com

पुणे – खरेदीचा बहाणा करुन सराफी पेढीत चोरी करणारी टोळी शहरात सक्रीय झाली आहे. वडगाव शेरी भागातील सराफी पेढीत खरेदीचा बहाणा करुन दोन महिलांनी ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना घडली. याबाबत सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यमात आला आहे.

तरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वडगाव शेरीतील जुन्या मुंढवा रस्त्यावर असलेल्या एका पेढीत कामाला आहेत. १२ जून रोजी रात्री आठच्या सुमारास दोन महिला खरेदीचा बहाण्याने सराफी पेढीत आल्या. त्यांनी तक्रारदाराला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगितले. तक्रारदाराला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून ६० हजारांची अंगठी चोरुन महिला पसार झाल्या.

अशाच पद्धतीची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात असलेल्या एका सराफी पेढीत नुकतीच घडली. चोरट्या महिलांनी खरेदीच्या बहाण्याने सोन्याची चमकी लांबविली होती. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, चंदननगर पोलिसांकडून पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×