Breking News
Women Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबितDharau Marathi Movie 2026 : ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय मायेच्या अतूट नात्याची भावस्पर्शी गोष्ट २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत

तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटक

तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटक

कोंढवा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरासह विविध भागात तब्बल १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असलेल्या सराईताला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, दुचाकी असा ३ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४७ रा. ७२ नंबर वस्ती, पाण्याचे टाकीजवळ, मांजरीगाव, हडपसर) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय – सविस्तर बातमी 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारदाराच्या फ्लॅटचे कुलूप कापून २१ तोळ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड, सोसायटीचा सीसीटीव्ही डीव्हीआर चोरून नेला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करुन सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला. सलग पाच दिवस १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासुन आरोपीचा माग काढण्यास प्राधान्य दिले. संबंधित घरफो सराईत अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधानी याने केली असुन, मांजरी गावातील घरी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने सापळा रचून अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी (वय ४७) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ३ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला. त्याने पुण्यासह विविध भागात तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, विकास मरगळे, राहूल थोरात, अभिजीत जाधव, सैफ पठाण यांनी केली.

घरफोडीतील गुन्ह्यातील सराईताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ लाखांहून अधिक ऐवज जप्त केला आहे. यापुर्वी संबंधित आरोपीविरूद्ध तब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे रेकॉर्ड आहे. याप्रकरणी आणखी तपास केला जात आहे. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×