Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

जिल्ह्यासाठी ११५ आधार नोंदणी संच मंजूर

जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी सुविधा वाढणार, 115 संच मंजूर

marathinews24.com

पुणे – नवीन आधार नोंदणी संच वितरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधार नोंदणी केंद्राकरिता अर्ज मागविणेत आले होते. यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले होते. यातील 272 अर्ज पात्र ठरले. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पात्र अर्जदारांसमक्ष आधार संच वितरण सोडत 12 जून रोजी घेण्यात आली. यामध्ये एकूण 115 पात्र अर्जदारांना नवीन आधार नोंदणी संचांची मंजूरी अटी व शर्तीच्या अधीन राहून देणेत आली.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली – सविस्तर बातमी

आधार नोंदणी केंद्राकरिता ग्रामीण कार्यक्षेत्राकरिता 65 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 62 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करणेत आली आहेत. नगर परिषद कार्यक्षेत्रामध्ये एकूण 7 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 7अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली. पुणे महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये एकूण 22 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 22 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आले तर पिंपरी चिंचवड महानगर पालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण 28 रिक्त केंद्र जाहिर केली होती त्यामध्ये 24 अर्जदारांना सोडतीद्वारे आधार केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.

या नवीन आधार संच वितरण सोडतीवेळी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी, श्रीमती पल्लवी घाटगे, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी व आधार संच वितरण समिती सदस्य उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×