पुणे – बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ११ लाख ८० हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना १३ मे रोजी ऑनलाईनरित्या कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय जेष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहाच्या आमिषाने फसवणूक; युवतीची आत्महत्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरूडमध्ये राहायला असून, १३ मे रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. बँक खात्याचे व्हेरिफिकेशन करण्याची बतावणी करीत त्यांना एक फाईल पाठविली. त्यामाध्यमातून सायबर चोरट्याने जेष्ठाच्या बँकखात्याचा अॅक्सेस घेउन ऑनलाईनरित्या ११ लाख ८० हजारांची रक्कम वर्ग करून घेतली. रक्कम वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर जेष्ठाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करीत आहेत.