Breking News
Crime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृतीलाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचली मदत व पुनर्वसन विभागाची वारीरुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचा वाद्यपूजन सराव शुभारंभ सोहळा उत्साहातपीएमपील बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकासकामांची पाहणीकीस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरीप्रेम संबंधातून तरुण-अल्पवयीन मुलीची आत्महत्या

डॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले – शरद पवार

डॉ. सबनीस यांनी नव्या पिढीला घडविण्याचे काम केले - शरद पवार

डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ उत्साहात

marathinews24.com

पुणे – साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना डॉ श्रीपाल सबनीस यांची दखल संबंध महाराष्ट्राने घेतली आहे. कवी लेखक, संपादक म्हणून त्यांची ओळख असून, चौफेर लिखानात सामान्यांच्या सुख दुःखाची मांडणी सहजतेने करतात. सामान्य माणसाचे दिशाहीन आयुष्य या कवितेतून सबनीस यांनी वास्तव मांडले आहे. साहित्य परिषदेच्या अध्यक्ष झाले असते, ते राज्यभर फिरले. त्यामुळे परिषदेला बळ मिळाले. नव्या पिढीला घडविण्यासाठी डॉ. सबनीस यांनी विशेष काम केले, असे प्रतिपादन जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

आळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनी – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यावतीने टिळक स्मारक सभागृहात आयोजित डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी समारंभाच्या अध्यक्षस्थानी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. श्रीपाल सबनीस, ललिता सबनीस, खासदार ओमराजे निंबाळकर, सचिन इटकर, चंद्रकांत दळवी, आमदार कैलास पाटील, भाऊसाहेब जाधव, कृष्णकुमार गोयल रवींद्र डोमाळे, सुनील महाजन उपस्थित होते.

पवार म्हणाले, मराठी भाषेत अत्यंत प्रभावी लिखाण करणारे न धो महानोर यांचे नाव आपण कधी विसरू शकत नाही. त्याच पद्धतीने सबनीस यांचे लिखाण आहे. प्राध्यापक म्हणून त्यांनी नव्या पिढीला घडविण्यासाठी विशेष काम केले आहे. टीका आणि योग्य असलेल्या विविध गोष्टींवर त्यांनी स्पष्टपणे मत मांडली आहे. त्यांचे लिखाण दिशा दर्शक आहे, म्हणून साहित्य क्षेत्रात त्यांचे नाव मोठे आहे. आजच्या दिवशी त्यांचा गौरव होतोय, त्याचा मला आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी मराठी साहित्य विश्वाला समृद्ध केले.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉ श्रीपाल सबनीस यांचा ७५ वाढदिवस साजरा करताना आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. त्यांनी सर्वधर्म समभाव बरोबरीने त्यांनी काम केले आहे. ते विचारवंत असून, बुद्धाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहे. दरम्यान, ज्यांच्या विचाराने महाराष्ट्र प्रफुल्लित होईल, त्यासाठी शरद पवार साहेब यांच्या शुभेच्छा सबनीस यांना महत्त्वाच्या ठरणार आहेत. समाज कसा घडवला पाहिजे, त्यांनी दिले. महाराष्ट्र आणि देश घडविण्याचे काम साहेबांनी केले आहे. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी अनेक संकटे आली आहेत, मात्र ते घाबरत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, धर्म हा आक्रमक झाला तो तर अशुद्ध होतो. नीतिमत्ता जगवणे आवश्यक असून, आता नवीन हिटलर जन्माला आली आहे. म्हणून जग बेचिराख झाले आहे. सत्ता ही सत्याची साधन असली पाहिजे. साहित्यिक इमानदार राहिले नाहीत. संस्कृती, संविधान, यासाठी इमानदारी बाळगणे गरजेचे आहे. १०० पिढ्यांची सोय राजकारण करणाऱ्या लोकांना का करावी लागत आहे. मी संबंध मानव जातीचा वारसदार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या मदतीला धावून जाणारे शरद पवार साहेब आहेत. दहशतवादी हल्ला झाला, त्यावेळी पवार साहेबांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला ते धावून गेले. आजच्या माझ्या अमृत महोत्सव कार्यक्रम दोन दिग्गज उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमामुळे मी खूप भावनाविवश झालो आहे. विश्वशांती, मानवता जपण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदअश्रू वाहिले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वडिलांनी रझाकार विरुद्ध लढा दिला होता. श्रीपाल सर हे माझ्या धाराशिव जिल्ह्याचे भूषण आहेत. कोणत्याही यशस्वी व्यक्तीमागे पत्नीचा वाटा असतो. ललिताताईंचा सन्मान करण्यात आला, याचा आनंद झाला. मी तरुण पिढीतील एकमेव खासदार अजून, मला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांचा सहवास लाभला. श्रीपाल सरांच्या विचारांची अनुभूती संपूर्ण महाराष्ट्राला मिळो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. विराज तावरे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top