दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील १२८ नागरिक सुखरूप परत

दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यात जमावबंदी आदेश लागू

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली माहिती

marahinews24.com

पुणे – दुबई येथे गेलेल्या पुणे जिल्ह्यातील नागरिकांपैकी आतापर्यंत १२८ नागरिक सुखरूप पुण्यात परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील एकूण २४६ नागरिक दुबई येथे गेले होते. त्यापैकी काल १११ नागरिक पुण्यात परतले होते. आज आणखी १७ नागरिक पुण्यात पोहोचले असून आतापर्यंत एकूण १२८ नागरिक सुखरूप परतले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे बारामती उपविभागात आयोजन – सविस्तर बातमी 

दरम्यान, २८ नागरिकांच्या विमान प्रवासाचे वेळापत्रक (फ्लाइट) पुनर्नियोजित करण्यात आले असून त्यांना लवकरच भारतात परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. उर्वरित ९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही. त्याबाबत संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक समन्वय सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

दुबई येथे अडकलेल्या सर्व नागरिकांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×