Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने १५ लाखांना गंडा

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 marathinews24.com

पुणे – प्लॉट विक्रीला आहे असे खोटे सांगून आणि फिर्यादीचा विश्वास संपादन करून तब्बल १५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कागदपत्रांची फेरफार करून हा गंडा घालणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी गुन्‍हा दाखल आहे. पोलिसांनी भरत ऊर्फ सागर विठ्ठल धुमाळ आणि विठ्ठल गणपतराव धुमाळ (दोघे रा. वीर, ता. पुरंदर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आनंद गोकुळ साळुंके (वय ४८, रा. स्वारगेट, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

वाघोलीत किरकोळ कारणावरून राडा, तरुणाला केले जखमी – सविस्तर बातमी

आरोपींनी फिर्यादी साळुंके यांना त्यांचा एक प्लॉट विक्रीचा असल्याचे सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून प्लॉट व्यवहारापोटी आरोपींनी १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी जागेचे कुलमुखत्यारपत्र करून दिले, मात्र प्रत्यक्षात जागेचा ताबा दिला नाही. साळुंके यांनी जेव्हा जागेचा ताबा मागितला आणि खरेदीखत करण्याची विनंती केली, तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करून त्यांचा विश्वासघात केला. हा सर्व प्रकार ऑगस्‍ट 2024 ते एप्रिल 2026 दरम्‍यान घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर साळुंके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.

कोथरूडमध्ये केक शॉप फोडले

कोथरूड परिसरातील वर्दळीच्या पौड रोडवर असलेल्या एका केक शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस करत मोबाईल चोरून नेला असून, याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तोहिल कलीम शेख (वय ३१, रा. संजय गांधी वसाहत, पाषाण, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचे कोथरूडमधील भुसारी कॉलनी येथे ‘बेकिंग गोकेक’ नावाचे केक शॉप आहे. दि. २० एप्रिलच्या रात्री फिर्यादींनी दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील अल्युमिनियमचा दरवाजा वाकवून काच फोडली आणि दुकानाचे नुकसान केले. चोरट्याने तिथून १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. सकाळी दुकान उघडायला गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×