Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

वाघोलीत किरकोळ कारणावरून राडा, तरुणाला केले जखमी

मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण

गाडीची काच खाली घेण्यावरून झाला वाद

marathinews24.com

पुणे – गाडीची काच खाली घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून तीन अज्ञात तरुणांनी एकाला लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याची घटना वाघोली परिसरातील केसनंद-वाडेगाव रोडवर घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, लोणी कंद पोलिसांनी पोलिसांनी तीन अज्ञात इसमांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. निलेश शिवाजी हरगुडे (वय ३४, रा. केसनंद, ता. हवेली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

उधारीचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला – सविस्तर बातमी

फिर्यादी निलेश हे चारचाकी गाडी पार्क करून थांबले असताना दुचाकीवरून तीन तरुण तिथे आले. त्यांनी निलेश यांना गाडीची काच खाली घेण्यास सांगितले. निलेश यांनी नाव विचारले असता, आरोपींनी काहीही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने दोन आरोपींनी निलेश यांना हाताने मारहाण केली, तर तिसऱ्या आरोपीने लोखंडी वस्तूने निलेश यांच्या डाव्या डोळ्यावर आणि उजव्या हाताच्या कोपऱ्यावर वार करून त्यांना जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेले. हा प्रकार दि. 20 एप्रिल रोजी केसनंद वाडेगाव शिवरस्‍त्‍यावर रात्री साडेसात वाजण्याच्‍या सुमारास घडला. याप्रकरणानंतर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगावात किरकोळ वादातून दगडाने मारहाण

आंबेगाव बुद्रुक परिसरात किरकोळ वादाचा राग मनात धरून एका तरुणाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने फिर्यादीच्या चुलत भावालाही फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वैभव ओर्से (वय २६) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. प्रदिप दिलीप चव्हाण (वय २८, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना आंबेगावातील सन ग्लोरी सोसायटीच्या समोर घडली. त्‍यानंतर आरोपी वैभव याने फिर्यादीचा मावस भाऊ ऋषिकेश लोंढे याला फोन करून “तुला जिथे सापडेल तिथे जीवे मारीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी प्रदिप यांना गाठून शिवीगाळ केली आणि दगड फेकून मारला. या दगडफेकीत प्रदिप जखमी झाले. पुढारी तपास आंबेगाव पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×