Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पैसे चोरल्याच्या आरोपावरुन १६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या पतीला अटक

हांडेवाडीतील ‘एनडीए’ मार्गदर्शन संस्थेतील प्रकार

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमधील हांडेवाडी परिसरात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) प्रवेश मार्गदर्शन संस्थेतील १६ वर्षीय विद्यार्थ्याने पैसे चोरीचा आरोप केल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संबंधित संस्थेचे संचालक, कार्यकारी अधिकारी, तसेच वसतिगृह पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार – सविस्तर बातमी

अवधूत उल्हास बडे (वय १६, रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील उल्हास म्हातारदेव बडे (वय ५४, रा. माऊली निवास, आनंदनगर, बीड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यशोतेज ॲकडमीचे तेजस पद्माकर पाटील (वय ३२, रा. गगन उन्नती टाॅवर्स, कात्रज-कोंढवा रस्ता), विकास सुरेश पाटील (वय ३२), पर्यवेक्षक वसंत तुकाराम सरकटे (वय ५५) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील हांडेवाडी रस्त्यावर संबंधित संस्थेचे प्रशिक्षण वर्ग आहे. या संस्थेत वसतिगृह सुविधा आहे. बीडमधील १६ वर्षीय विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत होता. १० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या संस्थेत एनडीए परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थी अकरावीत होता. त्याच्याबरोबर राहणाऱ्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने साडेतीन हजार रुपये चोरल्याचा आरोप केला हेता. त्यानंतर वसतिगृहातील पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्याला संस्थेतून काढून टाकणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून तो नैराश्यात होता.

त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. सुुरवातीला पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. संबंधित संस्थेतील संस्थापक, कार्यकारी अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती पालकांना दिली नव्हती. त्यांनी मुलाचे समुपदेशन केले नाही. त्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली. त्याचे समुपदेशन न करण्यात आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले, असे फिर्यादीत म्हटले अहो. पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×