Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात १८ लाख ७२ हजार बेशिस्त चालक जाळ्यात

पुण्यात १८ लाख ७२ हजार बेशिस्त चालक जाळ्यात

सीसीटीव्ही, टोविंग व्हॅन, अमलदारांकडून कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात १२ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या तब्बल १८ हजार ७२ हजार १०१ बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. सीसीटीव्ही, टोविंग व्हॅन, अमलदारांकडून ही कारवाई केली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ४ लाख १२ हजार २७८ जणांविरूद्ध कारवाई केली आहे. तर अमलदारांकडील डिव्हाईसच्या माध्यमातून १२ लाख ४६ हजार १७७ जण जाळ्यात अडकले. टोविंग व्हॅनद्वारे २ लाख १३ हजार ६४६ जणांविरूद्ध कारवाई केली आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पोलीस सज्ज – सविस्तर बातमी 

वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी बडगा उगारला होता. त्यामध्ये २७ वाहतूक विभागातंर्गत नो पार्विंâग, विना हेल्मेट दुचाकीस्वार, झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल तोडणे, लायसन्स न बाळगणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, प्रवाशी वाहतूक करताना ड्रेसकोड न वापरणे, विना सिटबेल्ट मोटार चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. दरम्यान, वाहतूक विभागाने मागील काही दिवसांत राबवलेल्या विविध उपक्रमामुळे वाहतूकीचा वेग सुधारण्यास मदत झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रतीतास यंदा जवळपास दुप्पट किलोमीटर अंतर वाहन चालक पार करीत आहेत. २०२४ मध्ये प्रतीतास ९ किलोमीटर अंतर पार केले जात होते. २०२५ मध्ये हे अंतर १७ किलोमीटर ५०० मीटर एवढे वाढले आहे.

वर्षभरात विशेष मोहिमेतील बेशिस्तांवरील कारवाई

ट्रिपलसीट प्रवास ६८ हजार ९४०
नो एन्ट्री- ५ लाख १ हजार ६६७
राँग साईट ड्रायव्हिंग-४३ हजार ९४९
धोकादायक ड्रायव्हिंग-५ हजार ८८९
मद्यपान करून वाहन चालवणे- ६ हजार २८१
वाहन चालवताना मोबाइल संभाषण- ४१ हजार ९६१
मोटारींना काळ्या काचा-१८ हजार ७६४
पदपथावरील पार्विंâग करणे- २ हजार ५४
पदपथावर वाहन चालवणे- ९ हजार ६९४
सिग्नल तोडणे- १ लाख १७ हजार २०२
इतर नियमांचे उल्लंघन- ११ लाख १६ हजार ८५५

एकूण – १९ लाख ८७ हजार २५६

बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वेळोवेळी प्राधान्य दिले होते. वर्षभरात शहरातील प्रत्येक वाहतूक विभागातंर्गत बेशिस्त चालकांवर कारवाई करुन तडजोड शुल्क वसूल केले. सीसीटीव्ही, डिव्हाईस, टोईंग व्हॅनद्वारेही कारवाईचा बडगा उगारला होता.
हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×