Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

बीडमधील गायकवाड हत्या प्रकरणात २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

बीडमधील गायकवाड हत्या प्रकरणात २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा सरकारी वकिल अजय राख यांचा व्यक्तिवाद ठरला महत्वपुर्ण

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जुन्या वादावरून तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या झाली होती. सिद्धांत गायकवाड असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय गायकवाड (रा. पात्रुड गल्ली, माळिवेस, बीड) अभिषेक सचिन गायकवाड (रा. बालाजी नगर, नांदेड) यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल यावलकर यांनी दि. १३ जानेवारीला दोषी ठरवुन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मका देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यांची १० लाख ४० हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी 

जुन्या वादातून आरोपींनी सिद्धांत किरण गायकवाड (वय २० वर्ष) याचे २ जुलै २०२२ रोजी अपहरण केले. आरोपी अक्षय गायकवाड व अभिषेक सचिन गायकवाड यांनी मोटार सायकलवर बसवुन घेवुन जाउन खंडेश्वरी परिसरात त्याला जबर मारहाण केली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गु .र के १०७/२०२२ गुन्हा नोंद करण्यात आला. जखमीला सुरवातीला काकु नाना हॉस्पिटल, बीड व नंतर ससुन हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाल्यावरून प्रकरणात कलम ३०२ वाढवण्यात आले. गुन्हयाचा तपास बीड शहर पोलिस उपनिरीक्षक पी. यु अंधारे यांनी केला. गुन्ह्याच्या तपासाच्या कामी दोन्ही आरोपींना अटक केली. त्याचबरोबर साक्षीदाराचे जबाब व इतर परिस्थितीजन्य पुरावा मिळुन आल्यावरून दोन्ही आरोपीविरूद्ध भादवी कलम ३०२,३०७,३६४,३४ भादवी प्रमाणे दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बीड यांच्याकडे दाखल करण्यात आले.

प्रकरण सुनावनीसाठी सत्र न्यायालय बीड येथे वर्ग करण्यात आले. प्रकरणाची सुनावणी तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. जोगळेकर, त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर बीड यांच्या समोर झाली. आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाब, वैद्यकिय पुरावा व इतर परिस्थीतीजन्य पुरावा यांचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकिल तथा शासकीय अभियोक्ता ऍड. अजय राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी दोन्ही आरोपी अक्षय गायकवाड (रा. पात्रुड गल्ली, माळिवेस, बीड) आणि अभिषेक सचिन गायकवाड (रा. बालाजी नगर, नांदेड) यांना भादवी कलम ३०२,३४ प्रमाणे दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भादवी कलम ३६४,३४ प्रमाणे दोषी धरून ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे व दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायची आहे. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल तथा शासकीय अभियोक्ता ऍड अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकिल बी. एस.राख, व सहा. सरकारी वकिल ए.बी. तिडके व फिर्यादी तर्फे ऍड एस.एस. सावंत यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी सुरेश कदम, एम. व्ही नागमवाड यांनी सहकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×