पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहन चालक जाळ्यात

वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँड ड्राइव्हची राबवली विशेष मोहिम

marathinews24.com

पुणे – नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन शहराच्या वेगवेगळ्या भागात २०८ मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करुन त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई – सविस्तर बातमी

नववर्ष स्वागताला भरधाव वेगाने वाहने चालविल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहन चालकांंविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले होते. नववर्ष स्वागताला मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबविली होती. शहरातील वेगवेगळ्या भागात २९ ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन वाहन चालकांची तपासणी केली. या कारवाईत २०८ वाहन चालकांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.

वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी ब्रीथ ॲनलायचर यंत्राचा वापर केला. यंत्राला जोडलेली प्लास्टिक नळी (ब्लोअर पाईप) प्रत्येक तपासणीनंतर नष्ट करण्यात आली. नववर्षाच्या रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात २०८ मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले. मुंढवा, बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, बालेवाडी परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येत आहे. नातळपासून पोलिसांनी कारवाई तीव्र केली. रेस्टारँट, बार, मद्यविक्री दुकानांच्या परिसरात वाहनचालकांचे प्रबोधन करणारी भित्तीचित्रे लावण्यात आली होती. मद्यप्राशन करुन वाहने चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. पोलिसांच्या कारवाईचा धसका आणि आवाहनामुळे यंदा वाहन चालकांनी विशेष काळजी घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×