Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई

मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई

पिंपरी चिंचवडमध्ये २४० वाहन चालकांवर कारवाई

marathinews24.com

पिंपरी चिंचवड – नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. कालावधीत काही वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायकरित्या वाहने चालवित असल्याने जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यापार्श्वभूमीवर अशा वाहन चालकांवर वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आदेश दिले होते.

मद्यधुंद तरुणाकडून हाॅटेलची तोडफोड – सविस्तर बातमी 

पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात आली. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतील १३ वाहतूक विभागांमार्फत एकूण ४७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २२० दुचाकीस्वार व २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक आढळून आले. संबंधित वाहन चालकांविरोधात न्यायालयात “ड्रंक अँड ड्राईव्ह” अंतर्गत खटले दाखल करण्यात येत आहेत.

यापुढेही अशाच प्रकारे विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून वाहन चालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत व होणारी न्यायालयीन कारवाई टाळावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×