Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मद्यधुंद तरुणाकडून हाॅटेलची तोडफोड

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील खराडी भागातील हाॅटेलमध्ये तोडफोड करणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने हाॅटेलमधील कामगाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. आतिष बाळासाहेब भगत (वय ३२, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाॅटेलमधील कामगार नीरज कमलेश गौतम (वय १९, रा. पाटीलबुवानगर, खराडी) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नायलाॅन मांजा बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील झेन्सार आयटी पार्क परिसरात एक हाॅटेल आहे. हे हाॅटेल इराणी चहासाठी प्रसिद्ध आहे. मंगळवारी (३० डिसेंबर) रात्री दहाच्या सुमारास हाॅटेलमध्ये आला. हाॅटेल उशिरापर्यंत का सुरू ठेवले, अशी विचारणा करून त्याने कामगार नीलेश गौतम याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने हाॅटेल बंद करण्यास सांगितले. नीरजने हाॅटेलमालक नीलेश गुरव यांच्याशी संपर्क साधला. मद्यधुंद तरुणाने हाॅटेलमधील साहित्याची तोडफोड करून शिवीगाळ केली. घाबरलेल्या नीरजने या घटनेची माहिती गुरव यांना दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर भगत याला ताब्यात घेण्यात आले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. भगत याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सावन आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×