Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

नायलाॅन मांजा बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

नायलाॅन मांजा बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घातक नायलाॅन मांजा बाळगल्या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कर्मचारी रमेश चव्हाण यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संकेत विजय चव्हाण (वय १९,रा. घायरी, सिंहगड रस्ता), यश सुदाम कडलग (वय १९), अथर्व सतीश पारवडे (वय २१, दाेघे रा. नऱ्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

एबी’ फॉर्म गिळला, शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रातीला मोठ्या प्रमाणवर पतंगबाजी केली जाते. पतंगबाजीसाठी नायलाॅन मांजाचा वापर करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढले आहेत. नायलाॅन मांजामुळे दुचाकीस्वार, तसेच पादचाऱ्यांना गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. पशुपक्ष्यांना नायलाॅन मांजामुळे गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने नायलाॅन मांजा बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घातली आहे. चव्हाण, कडलग, पारवडे यांच्याकडे नायलाॅन मांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करुन नायलाॅन मांजाची रिळे जप्त केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध पर्यावरण संक्षणक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार नरळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×