शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाखांची फसणूक

सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे सत्र कायम आहे. सायबर चोररट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात मेफेड्रोन विक्री करणारा नायजेरियन गजाआड – सविस्तर बातमी

तक्रारदार सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत संदेश पाठविला होता. चांगला परतावा देण्याच्या आमिषाने चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून १२ लाख दहा हजार रुपये घेतले. पैसे गुंतविल्यानंतर त्यांना परतावा, तसेच गुंतविलेली रक्कम परत केली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.

विमाननगर भागातील एका नागरिकाची दहा लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करत आहेत.

बँक खाते अद्ययावत करण्याची बतावणी

पुणे बँक खाते अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ६९ वर्षीय ज्येष्ठाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे दांडेकर पूल भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. बँकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. बँक खात्यातील माहिती अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी खात्यातून दोन लाख ३० हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×