Breking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटनदेऊळ बंद २” च्या पोस्टरने जिंकली प्रेक्षकांची मनेपुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीसप्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासाबसच्या धडकेत तरूण ठार, पिसोळीतील घटनासंयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफलराम नदीचे प्रदूषण रोखण्यासह नैसर्गिक अधिवासही जतन व्हावा-प्रा. विजय परांजपेगॅस बिल भरण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी घातला गंडापुण्यात चोरीच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपासनारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन

जादा परताव्याचे आमिष पडले २४ लाखांना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल २३ लाख ७६ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना जुलै ते १५ ऑक्टोबर कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेउरमध्ये कुटूंबियाला बेदम मारहाण, तिघांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, १० जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून शेअर ट्रेडींग कंपनीचे एजंट असल्याची बतावणी केली. तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर संबंधिताने त्यांना गुंतवणूक करण्यासाठी सांगितले. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे सांगितले. त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांत तक्रारदाराने तब्बल २३ लाख ७६ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

बँकेचा अ‍ॅक्सेस घेउन पावणेपाच लाखांचा गंडा

मोबाइल कस्टमर केअरला फोन करून आरोपीने तक्रारदार तरूणाचा मोबाइल क्रमांक बंद केला. त्यानंतर तोच क्रमांक पुन्हा स्वतःच्या नावाने सुरू करून तक्रारदाराच्या बँकखात्यातचा अ‍ॅक्सेस घेतला. त्यानंतर तक्रारदाराच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या तब्बल ४ लाख ६३ हजारांची रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×