थेउरमध्ये कुटूंबियाला बेदम मारहाण, तिघांविरूद्ध गुन्हा

वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरूद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका कुटूंबियाला बेदम मारहाण केल्याची घटना २२ नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास थेउरमधील चव्हाण वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने फिर्याद दाखल केली असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

बिबवेवाडीत रस्त्यावरील पथदिवे चोरीला, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला थेउर परिसरातील चव्हाण वस्तीवर राहायला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून तिघा जणांनी २२ नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास तक्रारदार महिलेचे घर गाठले. टोळक्याने महिला, त्यांचे पती, मुलगा, सून, मुलगी यांना दगडाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

घोरपडीत मोबाइल शॉपी फोडली

मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी ५० हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना २१ ते २२ नोव्हेंबर दरम्यान घोरपडीतील मंत्रा मोबाइल शॉपीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×