सनसिटी रस्त्यावर तरुणाच्या खून प्रकरणी ३ अल्पवयीन ताब्यात

सनसिटी रस्त्यावर तरुणाच्या खून प्रकरणी ३ अल्पवयीन ताब्यात

पोलिसांनी दोन तासात अल्पवयीनांना घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणाचा खून करून पसार झालेल्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. करण गिरीश काशीद (वय १९) असे खून झालेल्याचे नाव आहे. अल्पवयीन आणि करण यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीस्वार करण सिंहगड रस्ता भागातील सनसिटी परिसरातून निघाला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी त्याला अडवून कोयत्याने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात करण गंभीर जखमी झाला. सनसिटी परिसरात झालेल्या खून प्रकरणात परिसरात घबराट उडाली होती.

बुटात चावी ठेवणे अंगलट, दोन लाखांची घरफोडी – सविस्तर बातमी 

पसार झालेले अल्पवयीन हे कर्वेनगर परिसरातील वनदेवी मंदिराजवळ थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. खून प्रकरणानंतर पोलिसांनी दोन तासात अल्पवयीनांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, अजित शिंदे, प्रदीप राठोड, साधना पवार, रेहाना शेख, साईकुमार कारके, अमित गद्रे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×