Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा

महापालिकेत नोकरीच्या आमिषाने ११ लाखांची फसवणूक

आतापर्यंत ३१२ कोटी ४६ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि आकारणी विभागामार्फत मालमत्ताधारकांना महिला बचत गटांमार्फत घरोघरी जाऊन देयकांचे वितरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ३१२ कोटी ४६ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक २०१७ ची संख्या कायम राहणार

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख ३३ हजार ६६४ निवासी, औद्याेगिक, मिश्र, माेकळ्या जमीन, औद्योगिक अशा मालमत्ता आहेत. मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नांचा मुख्य स्त्रोत आहे. यंदा विभागाला एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने महिला बचत गटांच्या माध्यमातून देयकांचे वितरण करण्यात आले आहे. मालमत्ता कराचे देयक ऑनलाइन पद्धतीनेही महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

थकबाकीदार मालमत्ताधारकांना वितरित देयकासोबतच जप्तीपूर्व नोटीस देखील दिली जात आहे. आतापर्यंत ३२ हजार ५०० थकबाकीदार मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांनी तत्काळ थकबाकीसह चालू आर्थिक वर्षाचा कर भरावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे.

‘मालमत्ता कर देयकांचे वितरण पूर्ण झाले आहे. मालमत्ताधारकांनी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने कराचा भरणा करावा. अन्यथा मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. अद्यापही देयक मिळाले नसेल परिसरातील कर संकलन विभागीय कार्यालयाशी संपर्क करून देयक प्राप्त करून घ्यावे’असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×