Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना

जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना

सायबर चोरट्यांकडून गंडा

marathinews24.com

पुणे – ट्रेडींगमध्ये गुुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी ६९ वर्षीय नागरिकाला तब्बल ३३ लाख ४५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ फेबु्रवारी ते १८ मार्च २०२६ कालावधीत सदाशिव पेठेत घडली आहे. याप्रकरणी संबंधित जेष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यात हडपसरमधील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सदाशिव पेठेत राहायला असून, २४ फेबु्रवारीला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला. शेअर मार्केटची माहिती देउन अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले. ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळले, अशी बतावणी सायबर चोरट्यांनी केली. त्यानुसार जेष्ठाने अवघ्या एक महिन्यांत ३३ लाख ४५ हजार रूपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यांना परतावा न मिळाल्यामुळे जेष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण घोडके तपास करीत आहेत.

गुंतवणूकीच्या बहाण्याने जेष्ठाची ४६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा कमवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी आणखी एका जेष्ठ नागरिकाला तब्बल ४६ लाख ४३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ जानेवारी ते १७ मार्च कालावधीत बालेवाडीत घडली आहे. याप्रकरणी ६० वर्षीय नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×