Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

ट्रॅकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील हडपसरमधील घटना

खराडी, हडपसरमध्ये फ्लॅटमधून लॅपटॉप चोरीला

टॅकर चालकासह मालकाविरूद्ध हडपसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात अवजड वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन करीत बेशिस्तपणे वाहने दामटली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवाला मुकावे लागत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेषतः उपनगरात पाणी टँकरसह, डंपर आणि हायवा चालकांकडून नियमांचे उल्लंघन नियमांना तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण वाढीस लागले असून, दुचाकीस्वारांसह पादचार्‍यांना जीव मुठीत धरून वागावे लागत आहे.

गंजपेठेत भरदिवसा घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

बेदरकारपणे टँकर चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे संबंधिताचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १६ एप्रिलला दुपारी पावणे दोनच्या सुमारास हडपसर परिसरातील रवीदर्शन बसस्थानकाजवळ घडला आहे. याप्रकरणी टॅकर चालकासह मालकाविरूद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकाने जखमी दुचाकीस्वाराला रूग्णायलयात दाखल न करता पळ काढल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतीक अश्विन शेठ (वय ४३ रा. गुंजन सोसायटी, रास्ता पेठ )असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. नितीन बंबोली (वय ४४ रा. सॅलेसबरी पार्क) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्र्रतीक शेठ हे रास्ता पेठेत राहायला होते. १६ एप्रिलला दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते हडपसर परिसरात गेले होते. त्यावेळी भरधाव अज्ञात टँकर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून प्रतीक गंभीररित्या जखमी झाले. अपघातात जखमीला पाहून टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने जखमीला रूग्णालयात दाखल केले नाही. दरम्यान, टँकरमध्ये क्लिनरही नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बिराजगार तपास करीत आहेत.

कोंढव्यात दुचाकीस्वार तरूणाला लुटले

पुणे – दुचाकीवर प्रवास करीत घरी निघालेल्या दोघा तरूणांना अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील रोकड, मोबाइल असा १७ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १५ एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील नरवीर तानाजी मालुसरे चौकात घडली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राहणार्‍या ३६ वर्षीय तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला असून, १५ एप्रिलला रात्री साडेनउच्या सुमारास दोघेजण कोंढव्यातील नरवीर तानाजी मालुसरे चौकातून दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या तिघाजणांनी दुचाकीला गाडी आडवी उभी करून त्यांना थांबवले. चोरट्यांनी दोघा तरूणांना धमकावून त्यांच्याकडील १ हजार २०० रूपयांची रोकड आणि १६ हजारांचा मोबाइल असा ऐवज चोरून टोळके पसार झाले. याप्रकरणी दोघा तरूणांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×