Breking News
पुण्यातील टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाहीपोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरुणावर केला गोळीबारमहाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य – उद्योग मंत्री उदय सामंतस्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्‍या महिलेला अटकपुण्यात तब्बल १ कोटी १३ लाखांवर गुटखा, सिगारेट जप्तशासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरणक्रेडीट कार्ड योजनेच्या नावाखाली जेष्ठाची १० लाखांची फसवणूकथेउर फाटा परिसरात वाहनाच्या धडकेत पादचारी ठारजबरी चोरीप्रकरणी ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्याजादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना

जादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना

जादा परताव्याचे आमिष पडले ३६ लाखांना

महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा

marathinews24.com

पुणे – इंन्टाग्रामवरील शेअर मार्वेâटची लिंक ओपन करणे खासगी कंपनीतील महिला अधिकार्‍याला चांगलेच महागात पडले. सायबर चोरट्यांनी चागंल्या परताव्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल ३६ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना २५ फेबु्रवारी ते ३ मे २०२४ कालावधीत औंध मध्ये घडली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द तक्रार दाखल केली आहे.

तळजाई टेकडीवर तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला मगरपट्टा येथील खासगी कंपनीत कामाला आहेत. २५ फेबु्रवारी २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना इंन्टाग्रामवर शेअर मार्वेâटसंदर्भातील लिंक पाठविली होती. त्यांनी लिंक उघडली असता, २०० जणांच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये त्यांना अ‍ॅड करण्यात आले. सुरवातीला शेअर मार्वेâटमधील गुंतवणूकी संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर महिलेचे शेअर मार्वेâटमध्ये खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधारकार्ड कागदपत्रे मागविण्यात आली. त्यानंतर सुरवातीला ५० हजार गुंतवणूक करुन महिलेने खाते उघडले. काही दिवसांनी महिलेला बँकखात्यात ऑनलाईनरित्या जास्त फायदा असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी गुंतवणूकीला सुरूवात केली.

महिलेने जवळपास तीन महिन्यांत ३६ लाख ५० हजार रूपयांची गुंतवणूक केली. तेव्हा त्यांना संबंधित अ‍ॅपवर फायदा ६८ लाख रूपयांचा फायदा झाल्याचे दर्शनविण्यात आले. त्यामुळे त्यांनी रक्कम काढण्याची विनंती व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर केली. त्यांनी खाते व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता, े तुम्हाला २ लाख शेअर दिले आहेत. ते पहिले खरेदी करावे लागतील असे सांगितले. महिलेने पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांना लोन देण्यात येईल असे सांगितले गेले. मात्र, त्यांनी लोन घेण्यास नकार दिला ,तेव्हा त्यांना तुमचे बँक खाते, संपत्ती सील केली जाईल. कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली. तक्रारदार महिलेने ग्रुपमधील एकाशी फोनवर संपर्क साधला असता, त्यानेही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे सांगितले. याप्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ननवरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top