ससून रुग्णालयाला एएम इन्फोवेब फाउंडेशनकडून मदतीचा हात, ४० व्हीलचेअर व स्ट्रेचर भेट
Marathinews24.com
पुणे – रूग्णांप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एएम इन्फोवेब फाउंडेशनच्यावतीने ससून रूग्णालयासाठी प्रत्येकी ४० व्हीलचेअर आणि स्ट्रेचर नुकतेच सुर्पूत केले. अपुर्या साधनांमुळे ेअनेक महिन्यांपासून रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यापार्श्वभूमीवर एएम इन्फोवेब फाउंडेशनचे अध्यक्ष अली मर्चन्ट, संचालक आजम शेख यांच्या पुढाकाराने नवीन व्हीलचेअर, स्ट्रेचर रुग्णालयात देण्यात आले. त्यामुळे रुणांची होणारी ससेहोलपाट थांबण्यास मदत होत आहे.
न्यायालयाच्या निर्देशावरून वकिल व बँक अधिकार्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा – सविस्तर बातमी
ससून रूग्णालयात काही महिन्यांपासून अनेक व्हीलचेअर, स्ट्रेचर नादुरूस्त झाले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. रुग्णालय प्रवेशद्वार ते वॉर्डपर्यंतचे अंतर दूरवर असल्यामुळे नातेवाईकांकडून रुग्णांना दाखल करताना अडचणी येत होत्या. त्यानुसार समाजसेवक महेबूब नदाफ यांनी ही बाब एएम इन्फोवेब फाउंडेशनपर्यंत पोहोचवली. सामाजिक बांधिलकी जपत अध्यक्ष अली मर्चन्ट, संचालक आजम शेख यांनी तत्काळ प्रत्येकी ४० व्हीलचेअर आणि स्ट्रेचर ससूनला उपबल्ध करुन दिल्या आहेत. यावेळी ससूनचे डीन डॉ. एकनाथ पवार, सुपरिटेंडेंट यल्लाप्पा जाधव, शेळके साहेब, महेबूब नदाफ यांच्यासह डॉक्टर्स उपस्थित होते.