Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ४४८ नागरिकांना लाभ – स्वप्नील रावडे

येत्या २० मार्च रोजी करंजेपुल येथे शिबीराचे आयोजन; नागरिकांना शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

बारामती – महसूल विभागाच्यावतीने शिर्सुफळ येथे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ४४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. येत्या २० मार्च रोजी करंजेपुल येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून अधिकाधिक नागरिकांनी या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले.

विशाल छुगेरा प्रॉपर्टीजतर्फे चॅनेल पार्टनर्स संमेलनाचे आयोजन – सविस्तर बातमी

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

रावडे म्हणाले, नागरिकांना विविध विभागाच्या सेवा एकाच छताखाली देण्यासाठी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजन करण्यात येत आहे.

महसूल विभागातील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ अभिलेख दुरुस्ती, अकृषक तरतुदी सुधारणा, कमी जास्त पत्रके तयार करणे, पाणंद रस्ते, ई-मोजणी अर्ज, जिवंत ७/१२ टप्पा २ अंतर्गतच्या नोंदीबाबत मार्गदर्शन केले. विविध विभागाच्या योजना व सेवांविषयी मार्गदर्शन केले. या शिबीरामध्ये नागरिकांना भेडवासणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यात येत आहे, असेही श्री. रावडे म्हणाले.

तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते विविध विभागामार्फत देण्यात आलेल्या लाभाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शोभा शिंदे, पंचायत समिती सदस्य अनिकेत गावडे, सदस्या शामल वाबळे,
गट विकास अधिकारी किशोर माने, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक संजय धोंगडे, महसूल नायब तहसिलदार स्वाती गायकवाड, सरपंच जुई हिवरकर, शिर्सुफळचे मंडळ अधिकारी अश्फाक इनामदार तसेच मंडळातील ११ गावातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×