Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात तीन महिन्यात बाल लैंगिक अत्याचारांचे ५० गुन्हे

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार

जानेवारी ते मार्च महिन्यात विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – शहर परिसरात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) ५० गुन्हे दाखल झाले आहेत. जानेवारी ते मार्च महिन्यात विनयभंगाचे १४९ गुन्हे दाखल झाले आहे. बहुतांश गुन्ह्यातील आरोपी हे ओळखीतील आहे. ओळखीतील आरोपींनी अत्याचार, विनयभंगाचे गुन्हे केल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे.

त्या नराधमाला आजीवन कारावासाची शिक्षा – सविस्तर बातमी

नसरापूर, तसेच पर्वती पायथा परिसरात अत्याचारांच्या घटना घडल्या. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोक्सो, तसेच विनयभंग प्रकरणातील गुन्ह्यांची माहिती दिली. २०२४ मध्ये बोपदेव घाटात एका महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करण्यात आला होता. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. गेल्या वर्षी कोंढव्यातील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने सदनिकेत शिरून बलात्कार करण्यात आल्याची फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला. तेव्हा तरुणीने पोलिसांची दिशाभूल करुन खोटी फिर्याद दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. गेल्या वर्षी दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाच्या गुन्ह्यांमध्ये १२ ते १४ प्रकरणे गंभीर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बलात्कार प्रकरण

वर्ष – २०२५, दाखल गुन्हे – २४०
वर्ष – २०२६ दाखल गुन्हे – ४९
(जानेवारी ते मार्च )

विनयभंग प्रकरण
वर्ष – २०२५, दाखल गुन्हे – ६१३

वर्ष – २०२६, दाखल गुन्हे – १४०

(जानेवारी ते मार्च )

बाल लैंगिक अत्याचार प्रकरण

वर्ष – २०२५, दाखल गुन्हे – २९९

वर्ष – २०२६, दाखल गुन्हे – ५०

( जानेवारी ते मार्च)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×