आयपीओ खरेदीच्या बहाण्याने ५३ लाखांचा गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दाम्पत्याची २ कोटींची फसवणूक

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी मारला डल्ला

marathinews24.com

पुणे – आयपीओ खरेदीच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ५२ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२५ कालावधीत खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरूणाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँक खातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कारागिराकडून २१ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडी परिसरात राहायला असून, १९ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड करून घेतले. स्टॉकसह आयपीओमध्ये गुुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत त्यांचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अवघ्या एक महिन्यामध्ये सायबर चोरट्यांनी तक्रारदाराकडून ५२ लाख ४४ हजार रूपये वर्ग करून घेतले. त्यांना परतावा न करता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

चांगल्या परताव्याचे आमिष पडले ३२ लाखांना

शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल ३२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० सप्टेंबर ते २४ नोव्हेंबर २०२५ कालावधीत कोंढवे धावडे परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६७ वर्षीय नागरिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×