Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

डिझायनिंग अभ्यासक्रमात प्रवेशाच्या आमिषाने ७० विद्यार्थ्यांची फसवणूक

Medicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूक

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयातील डिझायनिंग अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ७० विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीतील एकासह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून – सविस्तर बातमी

याप्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीतील एकासह प्रथमेश अशोक राऊत (वय २६), प्रतिक्षा अशोक राऊत (वय २८, रा. पुनावळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा परिसरात फ्लोरिट काॅलेज ऑफ डिझायनिंग ही शैक्षणिक संस्था आहे. फिर्यादी मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. त्यांच्या मुलीला डिझायनिंग अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. फिर्यादीसह ७० विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपींनी शुल्क घेतले. हे शुल्क महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा केले. हे शुल्क एका महिला आरोपीच्या खात्यात जमा करण्यात आले. फिर्यादीने त्यांच्याकडे शुल्क जमा केल्याची पावती मागितली. तेव्हा आरोपींनी महाविद्यालयाच्या नावे शुल्क भरल्याबाबतची बनावट पावती दिली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×