Breking News
‘भारताची भीमज्योत’ बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारीवृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रमलोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा ‘… तर आपल्या पक्षाचा विस्तार वेगाने करणे हेच उद्दिष्ट’नवीन सोलर धोरण राज्यातील उद्योगांना मारकडेक्कन परिसरात टोळक्याची एकाला बेदम मारहाण, दातही पाडलेपुण्यात तरुणाचा खून करून पसार आरोपी सहा वर्षानंतर अटकेतशिवसेना महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांपर्यंत योजना पोहोचवापुण्यातील बुधवार पेठेत पुन्हा कोम्बिंग ऑपरेशनअसोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी ८४ टक्के मतदान

उद्या निकाल, कोण विजयी होणार ? याकडे सर्वांचे लक्ष

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोग येथील सरपंच पदाच्या निवडणुकीसह बीड जिल्ह्यातल्या १२ सरपंच आणि १९ सदस्य अशा ३१ रिक्त जागांसाठी मतदान झाले आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोग येथे मोठ्या कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडले. दुपारी एक वाजेपर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. मतदान प्रक्रियेच्या दरम्यान दोन्ही गटामध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांत केले.

वृक्षसंवर्धन आणि फिटनेसचा संगम, प्रसारासाठी विशेष उपक्रम – सविस्तर बातमी

दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने सरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणूक रिंगणात उतरल्या, त्यापाठोपाठ त्यांना स्वरुपानंद देशमुख यांनी आव्हान दिले. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर दि २८ एप्रिल रोजी प्रत्यक्षात मस्साजोग मध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. ही मतदान प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तीन मतदान केंद्र उभारण्यात आले होते, अजून कुठलाही अनुचीत प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे दिसून आले. मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. मात्र यास्थितीतही मतदान केंद्र परिसरात दोनही गटांमध्ये बाहेरून मतदान आणल्यावरून वाद झाला. दुपारपर्यंत ५० टक्के मतदान झाले होते दुपारनंतर मस्साजोग मध्ये साडेपाच वाजेपर्यंत हि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ८४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. गावामध्ये २२८० मतदार आहेत त्यापैकी १७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये प्रभाग क्र. एक ५९८. प्रभाग क्र. दोन ५५३, तर प्रभाग क्र. तीनमध्ये ५९४ असे मिळून एकूण १७४४ मतदान झाले आहे.या मध्ये पुरूषांचे मतदान ९३९ झाले तर महिलांचे मतदान ८०५ झाले आहे.

मस्साजोग गावामध्ये एकूण २२८० मतदान आहे त्यापैकी १७४४ मतदान झाले आहे. या पोटनिवडणुकीमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा १० टक्के मतदानात वाढ झाली आहे. उद्या निकाल आज जाहीर होणार आहे. त्यामुळे या सरपंच पदासाठी कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर झालेल्या गोंधळानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. बूथ केंद्रावर सर्व व्यवस्थित सुरू होतं. आम्ही बाहेर होतो तेव्हा काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही आलो तर तिथे गोंधळ सुरू होता. परंतु याठिकाणी मी एक शब्द बोललो नाही. माझे अंगरक्षक याचे साक्षीदार आहेत. संतोष अण्णांचा ज्या दिवशी अपहरण झालतं. तो व्यक्ती तीन महिने तुरुंगात होता तो त्याठिकाणी दिसून आला. त्याची जी वर्तणूक आहे त्याला जी वागवण्याची पद्धत आहे. या निवडणुकीच्या दरम्यान ती भीती वाटण्यासारखी आहे. त्याचाच प्रकार म्हणून बाहेर जो राडा झाला तो सर्वांनी बघितला. मला हा सगळा प्रकार सांगता येणार नाही मात्र तो व्यक्ती मतदान करून गेला आहे.

मतदान केंद्राबाहेर राड्यानंतर स्वरूपानंद देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मतदार राजा उत्साहात मतदान करत आहे.सामाजिक.लोकांमध्ये सतत राहणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला निवडून द्यायचे आहे.आज मला मतदार राजाला विनंती करून मतदान करुन घ्यायचे आहे. बिनविरोध होण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या गावात घडल्या नाहीत.मी सुद्धा या गावात सदैव झटणारा व्यक्ती आहे. मलाच बिनविरोध निवडून द्या अशी विनंती केली पण त्यांनी मान्य केली नाही. यामुळे ही निवडणूक होत आहे. संतोष देशमुख यांच्या बाबतीत न्यायालयीन लढाईत सिंपथी आहे. मात्र निवडणुकीत जनता माझ्यासोबत आहे.मस्साजोग च्या जनतेला काम करणारा माणूस हवा आहे. त्यामुळे मस्साजोगची जनता माझ्याच पाठीशी आहे.राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी आहे.भविष्यात आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसोबत न्यायाच्या लढाईत आहोत असे मत व्यक्त केले आहे.

गोंधळानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला-

मस्साजोग ग्रामपंचायतची सरपंच पदासाठी ची पोटनिवडणूक सुरू असताना मतदान केंद्राबाहेर जमाव होऊन गोंधळ झाल्याचा प्रकार घडला यामध्ये दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली असताना पोलीस अधिकारी महेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी धाव घेत सुरू झालेला वाद आटोक्यात आणला आहे. आणि पोलीस प्रशासनाकडून दुपारनंतर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

उद्या मतमोजणी

मस्साजोग मध्ये दि.२८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पोटनिवडणूकीचा निकाल दि.२९ एप्रिल रोजी केज येथील तहसील कार्यालयात मतमोजणीचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. या मतमोजणी प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रस्त्यालगत असलेल्या मतदान केंद्रावर अचानक गोंधळ उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मतदारांवर थोडाफार परिणाम झाला होता. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थिची भूमिका घेतली. तब्बल 15 मिनिटं हा राडा सुरू राहिला. पोलिसांनी कायद्याचा बडगा उघरल्यानंतर मात्र दोन्ही गटातील समर्थक पांगले. राडा घालणाऱ्या समर्थकांचे व्हिडिओ फुटेज पाहून रीतसर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

महेश क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक. केज

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×