Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यातील ९ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांचा दणका

पुण्यातील ९ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांचा दणका

शहरातील गंभीर गुन्हे करणाऱ्या ९ सराइतांना तडीपार करण्याचे आदेश 

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडी, लोणी काळभोर, हडपसरमधील फुरसुंगी परिसरात गंभीर गुन्हे करणाऱ्या ९ सराइतांना तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिले. ४१ सराइतांना तडीपार करण्यात आले असून एकूण मिळून १३७ सराइतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

स्वारगेटमध्ये भुयारी मार्ग दुरुस्ती कामासाठी वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

प्रेमलता मुकेश करमावत (वय ४५, रा. मंतरवाडी, फुरसुंगी), पंकज मुकेश करमावत (वय २५, रा. उत्तमनगर), मनोज रतन गुमाणे (वय ५०, रा. भीमनगर, मुंढवा), शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद (वय १९, रा. सुखसागनरनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), सागर संदीप गुडेकर (वय २४, रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर), जाफर शाजमान इराणी (वय ४३, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर), मजलूम हाजी सय्यद (वय ४८, पठारे वस्ती, लोणी काळभोर), शब्बीर जावेद जाफरी (वय ३८, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ), शाजमान हाजी इराणी (वय ६२, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

करमावत, गुमाणे यांच्याविरुद्ध गावठी दारू विक्री, बबलू सय्यद विरद्ध खुनाचा प्रयत्न, गुडेकरविरुद्ध खून, बेकायदा शस्त्र बाळगणे, इराणी टाेळीविरुद्ध फसवणूक, चोरी करणे असे गंभीर गु्न्हे दाखल आहेत. आरोपींना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा पोलिसांनी तयार केला होता. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. संबंधित प्रस्ताव मंजूर करून पोलीस उपायुक्त शिंदे यांनी करमावत, गुमाणे, गुडेकर, इराणी, सय्यद, जाफरी यांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले. परिमंडळ पाचमधील ११ टोळ्यांमधील ७६ गुंडांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे, तसेच २० गुंडांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. तडीपार गुंड शहरात आढळून आल्यास त्वरीत परिमंडळ पाच पोलीस उपायुक्त कार्यालयात (दूरध्वनी – ०२०- २६८६ १२१४) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×