19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत
marathinews24.com
पुणे – शहरातील स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत कै. केशवराव जेधे चौक (स्वारगेट) येथील भुयारी मार्ग दुरुस्तीची कामे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कालावधीत वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उप-आयुक्त (वाहतूक), पुणे शहर हिंमत जाधव यांनी दिली.
या कालावधीत केशवराव जेधे चौक स्वारगेट येथील भुयारी मार्गाने सारसबागकडे जाणारा रस्ता (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) वाहतुकीसाठी बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून भुयारी मार्ग सुरु होताना डावीकडील रस्त्याने जेधे चौकाकडे जाऊन तेथून सारसबागकडे (अण्णाभाऊ साठे पुतळा मार्गे) जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहन चालकांनी या कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





















