हडपसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन प्रवाशांचे मोबाइल चोरणार्या अल्पवयीनाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना ८ सप्टेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हडपसर गाडीतळ बसप्रवासात घडली होती. याप्रकरणी वाघोलीत राहणार्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या महिलांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी वाघोलीत राहायला असून, ८ सप्टेंबरला हडपसर गाडीतळ परिसरातून बस प्रवास करीत होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने तिचा मोबाइल चोरला. त्यानंतर दुसर्याही एका प्रवाशाचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी मुलीने तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार ओंबासे तपास करीत आहेत.
घरातून सोन्याच्या बांगड्या चोरीला
घरातील बॅगेतून चोरट्यांनी १ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. ही घटना ७ ते ८ सप्टेंबरला येरवड्यातील वडारवस्ती परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला कुटूंबियासह येरवड्यातील वडारवस्ती परिसरात राहायला आहेत. ७ ते ८ सप्टेंबरला चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर बॅगेतून १ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार तपास करीत आहेत.























