Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या महिलांचे दागिने चोरीला

गर्दीचा फायदा घेउन दागिने चोरले

marathinews24.com

पुणे – गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. या घटना विश्रामबाग परिसरात घडल्या असून, संबंधित महिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई – सविस्तर बातमी

पहिल्या घटनेत तक्रारदार महिला ६ सप्टेंबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास मध्यवर्ती शिवाजी रोडवर गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची चैन चोरून नेली. काही वेळानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार पडघमकर तपास करीत आहेत.

गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या कोथरूडमधील महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना ६ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास विश्रामबाग परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणासोबत भांडणाचा बनाव करीत लुटले

तरूणासोबत भांडणाचा बनाव करीत लुटले चोरट्याने त्याच्या गळ्यातील १ लाख रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना ६ सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास येरवड्यातील बंजारा चौकात घडली आहे. त्यानुसार मांजरी ब्रुद्रूकमध्ये राहणार्‍या १९ वर्षीय तरूणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×