Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

महिलेला मुल होण्यासाठी अघोरी विद्या, भोंदू बाबाला बेड्या

पीएमपीएल बसप्रवासात महिलेची सोन्याची बांगडी चोरीला

फसवणूक करणार्‍या भोंदू बाबाला सहकारनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

marathinews24.com

पुणे – महिलेला विविध पुजा केल्यानंतर मुल होईल असे आश्वासन देऊन अघोरी विद्याद्वारे पेढ्यातून अंगारा खाण्यास देत ३ लाख १५ हजारांची फसवणूक करणार्‍या भोंदू बाबाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गिरीष बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून भोंदू बाबावर महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २८ जुलै ते ९ सप्टेंबर २०२५ कालावधीत घडला.

कुख्यात आंदेकर टोळीला मोक्का कारवाईचा दणका – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बालाजीनगर परिसरात राहायला असून तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. मुलबाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेऊनही तिला मुल होत नव्हते. एक दिवशी ती गावाला गेल्यानंतर तिला गावाकडील व्यक्तीने आळंदी येथील देवऋषी बाबाबद्दल माहिती दिली. मुल होईल या आशेने तिने सासरी न सांगताच त्या भोंदू बाबाकडे जाणे सुरू केले. त्याने मुल होईल असे तिला आश्वासन देऊन अंगारा धुपारे करण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी लाखो रूपये उकळले. शेवटी त्याने तिला पेढ्यातून अंगारा खाण्यास दिला. यावरही तो थांबला नाही. त्याने तिच्याकडे पैशाची मागणी सुरूच ठेवली.

महिलेनी शेवटी तिच्याकडील मंगळसूत्र विकून त्या भोंदू बाबाला पैसे दिले. जेव्हा महिला घरी आली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मंगळसूत्राबाबत विचारणा केली. तेव्हा तिने मुला होण्यासाठी अंगारा धुपार्‍याला मंगळसूत्र विकल्याचे सांगितले. सर्व फसवुणकीचा प्रकार तिच्या सासरच्यांच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. याप्रकरणात आरोपीचा शोध घेऊन त्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

भोंदू गिरी करणार्‍या आरोपीला पोलीस पथकाने अटक केली आहे. महिलेला या भोंदू बाबाकडे घेऊन जाणार्‍यालाही आरोपी केले असून त्यालाही लवकर अटक केली जाईल. दरम्यान आरोपीने यापूर्वी अशा पध्दतीने किती जणांना फसविले आहे. याचाही शोध सुरू आहे. – विठ्ठल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×