Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

माॅडेल काॅलनीत घरफोडी, ३ लाखांचे दागिने चोरले

माॅडेल काॅलनीत घरफोडी, ३ लाखांचे दागिने चोरले

चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती भागातील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना माॅडेल काॅलनी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणार सराइत गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोथरूड भागात राहायला आहेत. शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनीत एका सोसायटीत त्यांची चुलत बहीण राहायला आहे. त्यांची चुलत बहीण कुटुंबीयांसोबत गोव्यात पर्यटनासाठी गेल्याने सदनिका बंद आहे. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चाेरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. गुरुवारी (११ सप्टेंबर) सायंकाळी घरफोडी झाल्याची प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. सहायक निरीक्ष अनिकेत पोटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×