Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण संरक्षणासाठी सायकल चालवा- माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली

marathinews24.com

पुणे – शारीरिक स्वास्थ्य, पर्यावरण सरंक्षणासाठी सायकल चालवणे अतिशय उपयुक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडियाचा नारा दिला असून, त्यांनी दिलेल्या पंचसुत्रीवर पुणेकरांनी आपले आरोग्य चांगले राखावे,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. मेधाताईंच्या पुढाकारातून मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी दिलेली ही अनोखी भेट असल्याचेही ठाकूर म्हणाले.

महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले. सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व चौक, तर वॉकेथॉनचा मार्ग एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत होता. पुणेकरांनी ‘सायकल चालवा’चा नारा देत शारीरिक स्वास्थ्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. विश्राम कुलकर्णी, जयंत भावे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ठाकूर व मिसाळ यांच्या हस्ते ७५ गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली. यावेळी दिलेल्या ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, ‘मोदी है तो, मुमकिन है’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

अनुराग ठाकूर म्हणाले, “पुण्यातील पर्यावरण मित्रांनी (पीएम) देशाच्या प्राईम मिनिस्टरांना (पीएम) दिलेली ही मानवंदना आहे. मेधाताई यांच्याप्रमाणे इतर लोकप्रतिनिधींनीही असे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी पुढाकार घ्यावा. देशवासीयांचे आरोग्य सदृढ व्हावे, यासाठी मोदी यांनी योगदिन, फिट इंडिया, खेलो इंडिया असे अनेक उपक्रम सुरु केले आहेत.”

माधुरी मिसाळ म्हणाल्या, “पुणेकरांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी, सायकल वापरल्यामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होतेच पण आरोग्यदायी जीवन जगणेही शक्य होते. समाजात जनजागृती व्हावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. मेधाताईंनी घेतलेला हा उपक्रम पुणेकरांच्या शारीरिक व पर्यावरण स्वास्थ्याचा समतोल राखणारा आहे. तसेच सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा होतोय, याचा आनंद वाटत असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले.

नवलकिशोर राम म्हणाले, “सायकलींचे शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा एकदा सायकल चालविण्याबाबत जागरूकता वाढत आहे. स्वतःचे व पर्यावरणाचे स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी सायकल चालवण्यास प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे. जवळपास पाच हजार आबालवृद्ध यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. योगपटू स्वरा केंजळे, ट्रेकर नंदकिशोर मुळीक, आयर्न किड विहान काशीकर, जाॅगलिंग खेळाडू केतन अमोणकर यांचा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. सर्व सहभागीना प्रमाणपत्र, पदक व टीशर्ट देण्यात आले. जयंत भावे यांनी सूत्रसंचालन केले. विश्राम कुलकर्णी यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×