Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

कृषी मंत्री दत्तात्रय भरण यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कृषी मंत्री दत्तात्रय भरण यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पुरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

marathinews24.com

पुणे – सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पुरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

कंपन्यानी स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – सविस्तर बातमी  

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री श्री. भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी.

पूरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिकांची ओढा खोलीकरणाची मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरणे यांनी दिले. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×